पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
श्री .तीर्थ क्षेत्र जोतिबा डोंगरला कोल्हापुर जिल्हयाच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज सदिच्छा भेट देऊन जोतिबा विकास आराखडा नियोजित स्थल पाहणी केली. यावेळी त्यांनी जोतिबा डोंगरावरील नियोजित विकास आराखड्याची स्थळ पहाणी केली.
जोतिबा देवस्थान आराखडा तयार करणाऱ्या समितीने दोन वर्ष जोतिबा डोंगरावरील माहिती घेऊन ज्योतिबा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 259 कोटी 59 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ जोतिबा डोंगरावरील नियोजित विकास आराखड्याची स्थळ पहाणी करण्यासाठी सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना सह पालकमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की ज्योतिबा देवस्थानाचं मूळ रूप जे आहे ते कायम ठेवून जोतिबा डोंगराचा जीर्णोद्धार करणार आहे. पुढील काळात ज्योतिबा हे मोठे तीर्थस्थान म्हणून उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी, नायब तहसीलदार संजय वळवी, बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन कुंभार, सह अभियंता विवेक चव्हाण, आर्टिस्ट्रक्चर संतोष रामाने, अभिनंदन मगदूम, ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तीवले,मंडल अधिकारी वासंती पाटील,तलाठी महेश पाटील यासह अधिकारी,पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते.