कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी लोककला फाउंडेशनच्या वतीने पन्हाळा गडावर आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पंचवीस विध्यार्थांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी घेत पंधरा हून अधिक प्लास्टिक बॅग भरून घनकचरा, प्लास्टिक, दारुच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.
या मोहिमेसाठी पन्हाळा नगरपरिषदने सहकार्य केले. यावेळी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्या हस्ते आणि आझाद नायकवडी यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पर्यावरण रक्षणाबरोबरच गडकिल्याचे सरंक्षण संवर्धन होणं गरजेचे आहे. गडकिलल्याच्या स्वच्छतेचे काम प्रत्येकाने हाती घेऊन ते निरंतर सुरू ठेवले पाहिजे. यासाठी आपले पन्हाळगडावर नेहमी स्वागतच असेल, असे आवाहन पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माळी यांनी केले.
स्वच्छता मोहिमेत फाउंडेशनच्या तीस हून अधिक विद्यार्थ्यांनी हातात झाडू, खराटे अशा सर्व साहित्यासह सहभाग घेतला. गडावरील मुख्य रस्त्यासह गड किल्ले स्वच्छ करून सुमारे पंधरा हून अधिक प्लास्टिक बॅग भरून घनकचरा, प्लास्टिक, दारुच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. यावेळी सी.ओ.ई.पी. टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणेचे विद्यार्थी उपस्थित होते.
———————————————————————————————-