कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅड टुरिइम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत छत्रपती शिवाजी महारांजाचा गौरवशाली इतिहास आगि भव्य वारसा दाखविण्यासाठी “भारत गौरव विशेष ट्रेन” व्दारे विशेष सहल दिनांक ९ जून २०२५ रोजी निघणार आहे.
अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेन ज्यामध्ये स्लीपर, एसी 2 टियर आणि एसी 3 टियर कोच आहेत आणि एकूण ७४८ पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. एकूण ५ रात्री आणि ६ दिवसांचा हा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन मुंबई पासून सुरु होईल. या टुरिस्ट ट्रेनमध्ये दादर आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरूनही पर्यटक चढू शकता.
टूरमध्ये खालील स्थळे समाविष्ट आहेत :
- रायगड किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीचे ठिकाण.
- पुणे : लाल महाल आणि कसबा गणपती मंदिर आणि शिवसृष्टी.
- शिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.
- भीमाशंकर : एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग.
- प्रतापगड : जिथे अफजलखानाबरोबर लढाई झाली.
- कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला..
यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या टूरमध्ये सहभाग होण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
सहभाग व अधिक माहितीसाठी –
IRCTC पर्यटन सुविधा केंद्र, प्लॅटफॉर्म नं १, छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स, कोल्हापूर किंवा IRCTC च्या वेबसाइटला भेट देऊ शकता. वेब पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ऑनलाइन बुकिंग उपलब्ध आहे.
————————————————————————————————



