माणगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ संपन्न..

0
205
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir' was completed under the guidance of MLA Shivajirao Patil and Chandgad Tehsildar Rajesh Chavan at Mangaon in Chandgad taluka.
Google search engine

चंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील माणगाव येथे आमदार शिवाजीराव पाटील आणि आणि चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ संपन्न झाले. यावेळी  आमदार शिवाजीराव पाटील आणि तहसीलदार राजेश चव्हाण यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. 

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान म्हणजेच हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सुरू केलेले एक विशेष अभियान आहे, ज्यामध्ये नागरिकांच्या विविध महसूल विषयक अडचणी, तक्रारी आणि सेवा गावपातळीवर तत्काळ, पारदर्शक आणि प्रभावीपणे सोडवण्याचा उद्देश आहे. आज याच अभियानांतर्गत माणगाव येथे नागरिकांना विविध दाखले एकाच छताखाली वितरीत करण्यात आले. 

यावेळी माजी राज्यमंत्री मा.श्री.भरमुआण्णा पाटील, चंदगडचे तहसीलदार मा.श्री.राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी मा.सौ.वृषाली यादव, मा.श्री.कुंभार साहेब, माणगाव गावच्या सरपंच सौ.रेणुका नरी , माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. पृथ्वीराज देसाई, श्री.दिग्वीजय देसाई, श्री.नाईक साहेब, श्री.अनिल शिवणगेकर सर,  माणगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here