छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वे वातानुकुलित, सुपर कोच, टीव्ही अशा सुविधांनी सज्ज असणार आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचै या रेल्वेचे डिझाईन असणार आहे. दहा दिवसांच्या कालावधीची ही ऐतिहासिक सफारी-टूर असून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विविध महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा त्यांच्या वास्तव्याने पुनित जागा आहेत आणि अर्थातच या सर्वांशी संबंधित इतर जी काही सांस्कृतिक स्थळे आहेत ही स्थळेही या रेल्वेमुळे पाहता येणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत असे सांगितलेआहे.. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरु करण्यात यणार आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने १० दिवस प्रवास करता येणार आहे. याशिवाय रेल्वेची अन्य विकास कामे करण्यात येणार आहेत. अशी माहिती दिली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे त्यांच्या दौर्यात मुम्बईस आले असताना त्यांच्या सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. त्यावेळेस ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास २४ हजार कोटी राज्याला मिळाले आहेत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरु करणार आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने १० दिवस प्रवास करता येणार आहे.
१३२ रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार
या विकास कामात राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.. त्यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. महाराष्ट्राला १ लाख ७३ हजार कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये मिळालेले आहेत आपण जर बघितलं तर यूपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाही, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वे वातानाकुलिक, सुपर कोच, टीव्ही अशा सुविधांनी सज्ज असणार आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची या रेल्वेची डिझाईन करण्यात येणार आहे. दहा दिवसांची ही टूर असून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विविध महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जी काही सांस्कृतिक स्थळे आहेत ही स्थळेही या रेल्वेमुळे पाहता येणार आहेत. अशी माहिती फडणवीस यांनी सांगितली.