अस्सल पुणेरी आणि एमबीए केल्यानंतर ब्रिटनच्या नॉटिंघम (यूके) मध्ये शिक्षण घेताना हर्षवर्धनला एकेदिवशी भारतीय पुरुषांसाठी आकर्षक, रंगीबेरंगी आणि पारंपरिक चपलाची कल्पना सुचली. भारतात पुरुषांसाठी नेहमीच काळ्या-कत्थक रंगांच्या बूट मर्यादित असतात. हर्षवर्धनने हेच बदलायचं ठरवलं आणि २०१५ मध्ये फक्त ५,००० रुपयांत – पारंपरिक कोल्हापुरी चपलांना मॉडर्न टच देण्याचं स्वप्न घेऊन चापर्स – चॅपर्स ब्रँडचा पाया घातला.
वडिलांचा उद्योग सोडून चप्पलचं दुकान टाकलं –
परदेशात शिक्षण घेऊन भारतात आल्यावर हर्षवर्धनकडे आपल्या वडिलांच्या ‘प्रसन्न टूर्स & ट्रॅव्हल’ च्या व्यवसायात रुजू झाला. काही काळ वडिलांच्या व्यवसायांत हात आजमावला पण त्याचं मन रमलं नाही. आपलं काहीतरी वेगळं करायची इच्छा आणि कोल्हापुरी चपलेच्या आवडीने हर्षवर्धनच्या आयुष्याला कलाटणी दिली. आपल्या याच आवडीचे त्याने एका व्यवसायांत रुपांतर केले आणि कोल्हापुरी चप्पलेचे मूळ डिझाईन न बदलता पण सगळ्यांना आवडेल असं मॉडर्न टच देऊन विशेषतः विविध रंग आणि मऊ म्हणजे टोचणार नाहीत अशी पादत्राणं बनवायच्या उद्देशाने चॅपर्स फूटवेअर ब्रॅड उदयाला आला.
कोल्हापुरी चपलेला दिला आधुनिक ट्विस्ट–
इथून हर्षवर्धनने मागे वळून पाहिलं नाही आणि रंग, मऊ लेदर आणि कंफर्टचा मेळ घालून तयार केलेल्या चप्पर्स तरुणांना पसंत पडू लागल्या. पुढे त्यांनी आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यावर आणखी भर दिला. ग्राहक चप्पर्सच्या वेबसाइट किंवा स्टोअरमधल्या टचस्क्रीनवर आपल्या चपलाची निवड करू शकतात. यामुळे खरेदी करणाऱ्यांना आपल्या आवडीचा रंग, लेदर, नक्षीकाम सगळं निवडण्याचं स्वतंत्र मिळालं.
राजकारणींपासून क्रिकेटर्सनाही चप्पर्सची भुरळ –
पुण्यात शनिवार पेठेतील एका कारखान्यात चॅपर्सचे उत्पादन होऊ लागले असून सध्या पंधराशे रुपयांपासून चपलेच्या किंमती सुरु होतात. याशिवाय सचिन तेंडुलकर, सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, राज ठाकरे, आदित्य ठाकरे चप्पर्सचे नियमित ग्राहक आहेत. हर्षवर्धनने फक्त महाराष्ट्रातच नाही तर दुबई, अमेरिका, फ्रान्स, येथेही कोल्हापुरी चपलांची बाजारपेठ निर्माण करून महाराष्ट्राची शान खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार पोहोचवली आहे.
———————————————————————————–