कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र शासनाने नुकतेच जीएसटी करप्रणालीत बदल केले आहेत. कराचे चार स्लॅब ऐवजी दोन स्लॅब केले आहेत. याचा दृष्य परिणाम दिवाळी दरम्यान दिसेल असे बाजार अभ्यासकांचे मत आहे. अनेक वस्तू व सेवांचे सध्याचे दर बदलणार असून, काही वस्तू व सेवा स्वस्त सुद्धा होणार आहेत.
केंद्राकडून देशात सध्या लागू असणारी चारस्तरीय जीएसटी प्रणाली अधिक सुटसुटीत करत दोन टप्प्यांमध्ये रुपांतरित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. गुरुवारी या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा-दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
सध्या ५, १२, १८ आणि २८ टक्के या चार टप्प्यांमध्ये जीएसटी आकारला जातो. त्याऐवजी आता फक्त ५ आणि १८ टक्के असे दोनच टप्पे लागू असतील. ज्यामुळं यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचे दर येत्या काळात कमी होणार आहेत. उलटपक्षी अतिचैनीच्या (Ultra Luxury) आणि ‘घातक’ श्रेणीत (सिन गुइस) मोडणाऱ्या वस्तूंवर ४० टक्के कर लावला जाणार आहे.
केंद्राच्या या निर्णयानं सामान्यांना दिलासा मिळणार असला तरीही या निर्णयामुळं नेमका किती महसूल बुडणार आणि असं झाल्यास हा तोटा नेमका कसा भरून काढणार? यासाठी पर्याय काय? याचे स्पष्टीकरण विरोधकांनी मागितले आहे. दरम्यान नव्या प्रणालीसाठीच्या तरतुदींवर मंत्री समुहानं केलेल्या शिफारसी आता अंतिम निर्णयासाठी उच्चस्तरीय जीएसटी परिषदेकडे पाठविण्यात येतील. परिषदेच्या मंजुरीनंतरच ही नवीन जीएसटी प्रणाली लागू होईल.
या वस्तू स्वस्त होणार :
मेवा, बँडेड नमकीन, टूथपेस्ट, टूथ पावडर, साबण, हेअर ऑइल, सामान्य अँटिबायोटिक्स यांचा समावेश आहे. याशिवाय पेनकिलर औषधं, सोबतच प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांचेही दर कमी होतील असं सांगण्यात येत आहे. स्नॅक्स, फ्रोजन भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल आणि कॉम्प्युटर, शिवणकामाचे मशीन, प्रेशर कुकर, गिझर, विजेशिवाय चालणारे पाण्याचे फिल्टर, इलेक्ट्रिक इस्त्री, व्हॅक्यूम क्लिनर, तयार कपडे – एक हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, ५०० ते १००० रुपयांच्या किमतीचे बूट, बहुतांश आजारांवरील लसी, एचआयव्ही/टीबी डायग्नोस्टिक किट, सायकल आणि भांडी, कंपास पेटी, नकाशे, ग्लेज्ड टाइल्स, व्हेंडिंग मशीन, सार्वजनिक वाहतुकीची वाहने, शेतीची यंत्रसामग्री, सोलर वॉटर हिटर, चॉकलेट, रेडी-मिक्स काँक्रीट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर, खासगी विमानं, कॉफी कॉन्संट्रेट, प्लास्टिक उत्पादने, रबरचे टायर, सिमेंट, सौंदर्य प्रसाधनं, अॅल्युमिनियम फॉइल, टेम्पर्ड ग्लास, प्रिंटर, रेझर, मॅनिक्युअर किट, डेंटल फ्लॉस. या किमती येत्या काळात स्वस्त होणार असल्याची चिन्हं आहेत.
——————————————————————————————-