कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा पावसास अनुकूल वातावरण तयार होत आहे. काल सकाळी तासभर व संध्याकाळी तासभर पाऊस झाला. दिवसभर उन कमी ढगाळ हवामान जास्त होते. आज सकाळ पासून ढगाळ हवामान आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हवामानाचे अंदाजानुसार, सायंकाळच्या तासांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. सध्याचे वातावरण ढगाळ असून सुमारे २४ अंश इतके तापमान आहे. झाडय़ांची सावली असलेले वातावरण आहे. दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत काही ठिकाणी पाउस होण्याची शक्यता आहे, तररात्री ८-१० वाजता पुन्हा पावसाची शक्यता दिसून येत आहे.
केंद्रीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. यानुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटांच्या ठिकाणी पुढील तासांत मध्यम ते हलका पाऊस होऊ शकतो. लोकांनी सावधगिरी बाळगावी, कारण हा पाऊस अचानक वाढू शकतो. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे राज्यातील विविध भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज विदर्भ, कोकण, घाटमाथा आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व आवश्यक तेथे बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील काही ठिकाणी पावसामुळे नदी-नाले भरून वाहण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकरी, वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्याव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.
————————————————————————————————————–



