कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
नांदणी येथील जैन मठातील हत्तीण माधुरीला वनतारा प्रकल्पातून परत आणण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) चे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विविध विषयांवर चर्चा करताना कोल्हापूरच्या माधुरी हत्तीच्या संदर्भातील मुद्द्यालाही विशेष महत्त्व दिलं. कोल्हापूरच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन, हा मुद्दा गांभीर्याने घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
माधुरी हत्तीबाबत केंद्राची सकारात्मक भूमिका
शिवसेना शिष्ट मंडळाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट



