कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. पुढील जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२६ मध्ये शांघाई येथे होणार आहे. स्पर्धेकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देवून दि. ३० सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
कौशल्य स्पर्धेकरिता पात्रता निकष
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ६३ क्षेत्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी विविध ५० क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे. तर उर्वरित १३ क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी २००१ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
शांघाई येथे आयोजित जागतिक स्पर्धा २०२६ जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक्स, इंजिनियरींग कॉलेज, हॉस्पिटॅलिटी इन्स्टीटयुट, IIT, CIPET, Corporate Technical Institute, Skill Training Centers, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellery Making, प्रशिक्षण संस्था, सर्व व्यससाय प्रशिक्षण संस्था यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, कावळा नाका, कोल्हापूर दूरध्वनी क्र. २५४५६७७ येथे संपर्क साधावा.
———————————————————————————————-