कृषी पुरस्कांरासाठी २० ऑगस्टपूर्वी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0
202
Google search engine

कोल्हापूर: प्रसारमाध्यम न्यूज

षी विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, महिला यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

सन २०२४ या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांनी वरीलप्रमाणे विविध कृषी पुरस्कारांसाठी परिपूर्ण प्रस्ताव आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक २० ऑगस्टपुर्वी सादर करावेत, असे आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

पुरस्काराचे नाव, पुरस्कार संख्या, पुरस्काराची रक्कम, पुरस्काराचे स्वरुप असे :
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार- राज्यातून फक्त एक- पुरस्काराची रक्कम ३ लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र.

वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम २ लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र.

जिजामाता कृषीभूषण पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम २ लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र.

कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम २ लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र.

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम १ लाख २० हजार रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र.

युवा शेतकरी पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम 1 लाख 20 हजार रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र.

उद्यानपंडित पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम 1 लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र.

वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार – (सर्वसाधारण व आदिवासी गट) प्रति जिल्ह्यातून एक- पुरस्काराची रक्कम 44 हजार रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र.

विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यासाठी अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी सहाय्यक/उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here