ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कारासाठी आवाहन

0
244
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सन- २०२४-२५ यावर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी कोल्हापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबर पर्यत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख, ७५ हजार, ५० हजार, २५\ हजार इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. तसेच राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालयसेवक यांना प्रत्येकी ५० हजार रु. तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रु. इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here