कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारत आणि पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीए परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आता या परीक्षा १६ मे ते २४ मेदरम्यान होतील.
भारत-पाकमधील तणावामुळे सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मूळ वेळापत्रकानुसार या परीक्षा ९ ते १४ मे या दरम्यान नियोजित होत्या. या परीक्षा सुरक्षेच्या कारणामुळे काही शहरांमध्ये या परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे आयसीएआयने परीक्षा स्थगित केल्या होत्या.
शुक्रवार, १६ मे : फायनल परीक्षा (ग्रुप २) पेपर ५ -इंडायरेक्ट टॅक्स लॉ/इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी-एटी) पेपर १ – इंटरनॅशनल टॅक्स-ट्रान्सफर प्रायसिंग
रविवार, १८ मेः फायनल परीक्षा (ग्रुप दोन) पेपर ६-इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स/आयएनटीटी-एटी पेपर – २ – इंटरनॅशनल टॅक्स प्रॅक्टिस
गुरुवार, २२ मे : इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ५ -ऑडिटिंग अँड एथिक्स
शनिवार, २४ मे: इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ६ -फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट



