महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन व अदानी समूहाची बैठक; सीएसआर निधीवर भर

0
12

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक

महाराष्ट्रातील सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बैठक महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन आणि अदानी समूह यांच्यात नुकतीच पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र तसेच धारावी परिसरातील सामाजिक उपक्रमांसाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीचा प्रभावी वापर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

“महाराष्ट्र धारावी सोशल मिशन” अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये राज्यातील स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून त्यांना सीएसआर निधीच्या माध्यमातून सक्षम बनवून व्यापक सामाजिक परिवर्तन घडविण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ युवराज येडूरे, अदानी उद्योग समूहाचे भारत वासवानी तसेच काश्मिरा सांभू उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here