कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महा रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. या धर्तीवर आज भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने शहरातील नऊ मंडलांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरांमध्ये नागरिकांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज दिवसभरात झालेल्या सर्व ठिकाणच्या रक्तदान शिबिरांमध्ये पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
सेवा रुग्णालय कसबा बावडा, राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी, महादेवराव जाधव वाचनालय टाकाळा, शिवाजी तरुण मंडळ शिवाजी पेठ, दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ, नेहरूनगर सोसायटी हॉल, खेल खंडोबा मंदिर परिसर हॉल या ठिकाणी रक्तदान शिबिरे झाली. या रक्तदान शिबिरांमध्ये नागरिकांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज दिवसभरात झालेल्या सर्व ठिकाणच्या रक्तदान शिबिरांमध्ये पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विविध ठिकाणी शिबिराला भेटी दिल्या. याप्रसंगी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिर यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष धीरज पाटील, सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, राजगणेश पोळ, रविकिरण गवळी, प्रीतम यादव, विनय खोपडे, कोमल देसाई, सुनील पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
——————————————————————————————–