कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय जनता पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता विशेषत: भाजपमध्येच आहे. याचबरोबर अन्य राजकीय पक्षांनाही लागली आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यानंतरच नवीन अध्यक्षाची घोषणा होईल. तथापी भाजपच्या नवीन केंद्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित झाले आहे. होऊ घातलेले अध्यक्ष पंतप्रधान मोदींच्या खास मर्जीतील आहेत.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबद्दल बऱ्याच चर्चा सुरु होत्या. संघटनेत काम करण्याचा प्रदिर्घ अनुभव असलेल्या नेत्याकडे अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची माहिती भाजपमधील सुत्रांनी दिली. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण यांच्या नेतृत्त्वात एक बैठक होत आहे. त्यात निवडणुकीच्या तारखेवर औपचारिक शिक्कामोर्तब होईल.
७१ वर्षांच्या खट्टर यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. ते आता कर्नाल लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. खट्टर हे हरयाणातील रोहतकमधील पंजाबी कुटुंबातून येतात. २०१४ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. त्याआधी ते संघटनेत काम करत होते. त्यापू्र्वी त्यांनी अनेक वर्षे संघात काम केलं. ते मोदी यांच्यासारखेच प्रचारक होते. १९७७ मध्ये ते संघात सक्रिय झाले. आजन्म अविवाहित राहण्याची शपथ घेऊन त्यांनी स्वत:ला जनसेवेसाठी वाहून घेतलं. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी १४ वर्षे काम केलं. १९९४ मध्ये ते संघातून भाजपमध्ये आले.
———————————————————————————-



