पन्हाळा : प्रसारमाध्यम न्यूज
पन्हाळा तालुक्यातील काखे येथील बिरदेव मंदीर परिसरातील शासकीय जागेतील अतिक्रमण काढणेचा आदेश असताना जाणीवपूर्वक मुदतवाढ दिल्यामुळे व वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली होत असले बाबत बिरदेव धनगर समाज विकास मडळ व समस्त धनगर समाजाच्या वतीने शेळया, मेढया सहित पन्हाळा पंचायत समिती येथे अमरण बेमुदत उपोषण करण्यात आले आहे
पन्हाळा तालुक्यातील काखे येथे गट नं. २६१ ‘अ’ मध्ये श्री बिरदेव मंदीर आहे तसेच मंदीरा समोर विविध धार्मिक कार्यासाठी व गावातील यात्रा, उत्सव करणेसाठी रिकामी जागा आहे. या जागेत काखे या गावातील भीमराव धोंडीराम वाघमोडे, सरदार सुबराव लोहार, दादासो मारूती सुर्यवंशी या सर्वानी राजकिय बळाचा वापरत अतिक्रमण केल्याचा आरोप करत दादासो सूर्यवंशी यांचे अतिक्रमण निघण्यासाठी हे उपोषण करण्यात आले आहे.
याचा मंदीरातील गावाच्या वतीने होणा-या धार्मिक कार्यांवर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे हे अतिक्रमण लवकरात लवकर काढावे अशा मागणीचे एक निवेदन पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांना देण्यात आले. यावेळी पन्हाळा पंचायत समिती जवळ धनगर ढोल शेळ्या मेंढ्या यांच्यासह धनगर समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपोषणासाठी बसले आहेत.

बिरदेव धनगर समाजाच्या वतीने सोमाजी वाघमोडे, उत्तम डोले, प्रवीण वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, आनंदा वाघमोडे, तानाजी वाघमोडे, पिंटू वगे आधी उपस्थित होते.



