सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

अमेरिका मध्यस्थीनंतर इराण-इस्त्रायल संघर्ष संपला;

0
195
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इराण आणि इस्त्रायल यांच्यात तब्बल १२ दिवस सुरु असलेला संघर्ष अखेर संपला आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केल्यानंतर जागतिक बाजारपेठेवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. विशेषतः सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

जगभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत सोन्याचे दर उच्चांक गाठत होते. २२ एप्रिल रोजी पहिल्यांदाच सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या टप्प्याला गेला होता. त्यानंतरही काही काळ सोन्याचे दर लाखांच्या वरच होते. मात्र, संघर्ष निवळल्यानंतर सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यातील मागणी कमी झाल्याने दर घसरू लागले आहेत.
आजचे सोन्या-चांदीचे दर
जून महिन्याचा शेवटचा दिवस आणि आठवड्याचा पहिला दिवस असलेल्या सोमवारी (३० जून) सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. बाजार उघडताच खालील दर नोंदवले गेले.
  • २४ कॅरेट सोनं (प्रति तोळा) — ₹ ९७,५८३

  • २२ कॅरेट सोनं (प्रति तोळा) — ₹ ८९,४६३

त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून, चांदी प्रति किलो दरात घट नोंदवण्यात आली आहे.
संघर्ष संपल्यानंतर बाजारात स्थिरता
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता होती. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोनं-चांदी खरेदी करत होते. आता परिस्थिती काही प्रमाणात स्थिर झाल्याने गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजार व इतर गुंतवणुकीकडे वळू लागला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे.
अमेरिका, चीन यांच्यातील व्यापारी तणाव काही प्रमाणात निवळला आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इराण आणि इस्त्रायल यांच्यात तब्बल १२ दिवस सुरु असलेला संघर्षही संपला आहे. या सर्व घटनांचा थेट परिणाम जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरांवर पाहायला मिळतो आहे.
डॉलरच्या मूल्यात घट झाल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय तणाव काहीसा कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणुकीकडे असलेला ओघ मंदावला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात काही प्रमाणात तेजी आली आहे. स्पॉट गोल्ड ०.३ टक्क्यांच्या वाढीसह ३२८१.६५ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे.
देशभरातील प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर :
शहर २२ कॅरेट (प्रति तोळा) २४ कॅरेट (प्रति तोळा)
नवी दिल्ली ₹८९,४६० ₹९७,५८३
मुंबई ₹८९,३१७ ₹९७,४३७
बंगळुरू ₹८९,३०५ ₹९७,४२४
चेन्नई ₹८९,३११ ₹९७,४३१
कोलकाता ₹८९,३१५ ₹९७,४३५

चांदीच्या दरातही थोडी घसरण नोंदवण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी, युद्धजन्य स्थिती, डॉलरचा दर आणि महागाई हे घटक सोन्याच्या किंमतींवर थेट परिणाम करतात. सध्याच्या परिस्थितीत इराण-इस्त्रायल संघर्ष थांबला असला तरी, व्यापारी तणाव आणि इतर राजकीय घडामोडी कायम आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना किंवा खरेदी करताना बाजाराचा आढावा घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

——————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here