मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासासाठी आणि समाजहितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उद्योग, सहकार, सामाजिक न्याय, ऊर्जा, बांधकाम यांसह विविध क्षेत्रांमध्ये पुढील टप्प्यासाठी नियोजन आणि अर्थसहाय्य यांना मंजुरी देण्यात आली.
उद्योग विभाग – डिजिटल क्षेत्रासाठी मोठे पाऊल
महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिऍलिटी धोरण २०२५ जाहीर करण्यात आले. सन २०५० पर्यंत नियोजन करून सुमारे ₹ ३,२६८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. डिजिटल उद्योगाला चालना देण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
वस्त्रोद्योग विभाग – अकोला येथील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
अकोला येथील ‘ दि निळकंठ सहकारी सूतगिरणी ’ ला “खास बाब” म्हणून अर्थसहाय मिळणार आहे. ५:४५:५० या गुणोत्तरानुसार अर्थसहाय्य दिले जाणार असून, त्यामुळे स्थानिक रोजगार व उद्योग क्षेत्राला बळ मिळेल.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य – विद्यार्थ्यांसाठी दिलासा
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळून शिक्षण सुरू ठेवण्यास मदत होणार आहे.
सहकार व पणन विभाग – शेतकरी व बाजार व्यवस्थेला बळ
-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील २ वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. राज्यभरातील ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन उभारणी आणि दुरुस्तीवर ₹१३२.४८ कोटींचा खर्च होणार आहे.
-
७९ नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव मंजूर झाले.



