प्रसारमाध्यम प्रतिनिधी | डिजिटल डेस्क
केंद्र सरकार व तेलंगणा पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा !
आजच्या घडीला जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप वापरात आहे. मात्र, याच लोकप्रिय अॅपचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधला असून याला ‘व्हॉट्सअॅप घोस्ट पेअरिंग’ असे नाव देण्यात आले आहे. या नव्या स्कॅमबाबत तेलंगणा पोलिसांसह केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे.
‘घोस्ट पेअरिंग’ स्कॅम नेमका काय आहे?
हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने
“हाय… तुमचा हा फोटो तुम्ही पाहिलात का?”
असा मजकूर पाठवून एक संशयास्पद लिंक शेअर करतात.
या लिंकवर क्लिक करताच एक बनावट WhatsApp Web पेज उघडते आणि कोणताही OTP किंवा QR कोड स्कॅन न करता वापरकर्त्याचे व्हॉट्सअॅप थेट हॅकर्सच्या डिव्हाइसशी लिंक होते. यानंतर मूळ वापरकर्त्याचे खाते लॉक होते.
⚠️ पेअरिंगनंतर काय धोका?
तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरोच्या संचालिका शिखा गोयल यांनी सांगितले की,
-
वैयक्तिक चॅट्स
-
फोटो, व्हिडिओ
-
बँकिंग व आर्थिक माहिती
ही सर्व माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागते. त्यानंतर हॅकर्स वापरकर्त्याच्या नावाने इतरांना संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करतात.
🛡️ MeitY व पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना
-
संशयास्पद लिंक्सवर कधीही क्लिक करू नका
-
WhatsApp Settings → Linked Devices नियमित तपासा
-
अनोळखी डिव्हाइस आढळल्यास त्वरित Log out करा
-
Two-Step Verification अनिवार्यपणे सुरू ठेवा
-
अॅप्स व ब्राउझर नेहमी अपडेट ठेवा
अकाउंट हॅक झाल्यास काय करावे?
-
त्वरित WhatsApp/ब्राउझरचा वापर थांबवा
-
संशयास्पद मेसेज, लिंक्सचे स्क्रीनशॉट घ्या
-
बँकिंग, ईमेल व सोशल मीडिया पासवर्ड बदला
-
आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा
📞 तक्रार कुठे करावी?
सायबर फसवणूक झाल्यास
📱 हेल्पलाईन : 1930
🌐 वेबसाइट : cybercrime.gov.in https://cybercrime.gov.in/Hindi/Defaulthn.aspx
येथे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





