बेल्ट प्रमाणपत्रामुळे मुलांना प्रोत्साहन मिळाले : डॉ. उज्वला कांबळे

0
202
The certificate distribution program for students of Sanketha Sawant's Taekwondo Training Center was held at the Abhyudayanagar Multipurpose Hall.
Google search engine
रत्नागिरी : प्रसारमाध्यम न्यूज
“यलो बेल्ट प्रमाणपत्राच्या वितरणामुळे मुलांना आणखीन मेहनत करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे “असे प्रतिपादन डॉ. उज्वला कांबळे यांनी केले. अभ्युदयनगर बहुउद्देशीय सभागृह येथे संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

सकेता संदेश सावंत यांचे तायक्वादो प्रशिक्षण केंद्र सुरू असून परिसरातील विद्यार्थी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. नुकत्याच झालेल्या यल्लो बेल्ट एक्झाममध्ये या प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये दूर्वा रोहन कवितके, शिवाज्ञा शुभम पवार, उत्कर्ष नीरज जैन, शौर्य सुनील घाणेकर आणि नायशा मयूर कांबळे या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास झाल्याचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. 

यावेळी मुलांची पुमसे प्रात्यक्षिके घेण्यात आली. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा खेळ उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली. उपस्थित पालकांच्या हस्ते ही प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. संकेता सावंत यांच्या अभ्युदय नगर इथल्या या प्रशिक्षण केंद्रात आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त मुलांनी या खेळाच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उज्वला कांबळे यांनी यावेळी केले आहे.

————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here