Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय रा.माळकर

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  मुंबई ते विजयदुर्ग अशी M2M फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होणार आहे.

या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना रेल्वे व रस्त्यावरील प्रचंड गर्दी टाळता येणार असून अवघ्या ७ तासांत समुद्रमार्गे कोकणात पोहोचता येणार आहे. मंत्री नितेश राणे

 यांनी या सेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून स्वतः ते पहिल्या दिवशी फेरीने प्रवास करणार असल्याचे सांगितले आहे.

फेरी सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग या मार्गावर धावणार आहे. त्यामुळे मुंबईहून तळकोकणात जाणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

 M2M फेरी वेळापत्रक

तारीख सुटण्याचे ठिकाण सुटण्याची वेळ पोहोचण्याचे ठिकाण पोहोचण्याची वेळ
1 मार्च भाऊचा धक्का सकाळी 8:00 विजयदुर्ग दुपारी 3:00
2 मार्च विजयदुर्ग दुपारी 12:00 भाऊचा धक्का सायंकाळी 7:00
4 मार्च भाऊचा धक्का सकाळी 8:00 विजयदुर्ग दुपारी 3:00
5 मार्च विजयदुर्ग दुपारी 12:00 भाऊचा धक्का सायंकाळी 7:00
7 मार्च भाऊचा धक्का सकाळी 8:00 विजयदुर्ग दुपारी 3:00
8 मार्च विजयदुर्ग दुपारी 12:00 भाऊचा धक्का सायंकाळी 7:00

 

प्रवास कालावधी: अंदाजे ७ तास
उद्दिष्ट: शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी करणे

 रेल्वेच्या १८६ विशेष फेऱ्या

शिमगा आणि होळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेत तब्बल १८६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

विशेष गाड्यांचे तपशील:

  •  ९४ होळी विशेष फेऱ्या (फक्त सणासाठी)

  •  ९४ नियमित विशेष फेऱ्या

  •  प्रमुख मार्ग:

मुंबई – सावंतवाडी

मुंबई – नागपूर

पुणे – नागपूर

मुंबई–सावंतवाडी मार्गावरील गाड्यांमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकणवासीयांसाठी दिलासा

दरवर्षी शिमग्याच्या काळात रेल्वे आरक्षण, महामार्गांवरील ट्रॅफिक आणि प्रचंड गर्दी यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मात्र यंदा समुद्रमार्गे फेरी सेवा आणि विशेष रेल्वे फेऱ्यांमुळे कोकणातील प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

यामुळे कोकणवासीयांना आनंदात, कुटुंबियांसह शिमगा साजरा करण्यासाठी वेळेत गावी पोहोचता येणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here