सोलापूरच्या शेतकऱ्याने पिकवला 3 किलोचा आंबा : नाव ठेवले शरद मँगो

0
161
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

माढा तालुक्यातील अरण गावातील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी त्यांच्या बागेत आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करून तीन किलो वजनाचे आंबे पिकवले आहेत. या तीन किलोच्या आंब्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यांनी या आंब्याचे नाव ‘शरद मँगो’ असे ठेवले आहे.

फळांचा राजा आंब्याचा हंगाम सध्या सुरू आहे. हापूस, पायरी, रायवळ अशा अनेक प्रकारातील आंबे बाजारात आले आहेत. आंब्याचे दर वाढले असे म्हणत सर्वच जण आंबे खातात. कारण, तीन ते चार महिनेच हा आंब्यांचा हंगाम असतो.अशातच या तीन किलो वजनाच्या आंब्याची चर्चा रंगली आहे. त्यासह त्यांनी त्याला दिलेल्या नावाने ही हा आंबा भाव खातो आहे.

शरद पवार मँगोची गोष्ट –

दत्तात्रय घाडगे यांनी त्यांच्या बागेत विविध प्रकारच्या आंब्यांचे कलम करण्याचे प्रयोग केले. या शेतीसाठी त्यांनी शरद पवार यांच्या माजी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झालेल्या फळ बाग योजनेची मदत घेतली. या अनोख्या आंब्याला पेटंट देखील मिळाले आहे. विविध प्रकारच्या आंब्यांची कलमे केली गेली. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना फळ बाग योजना राबविण्यात आली होती. त्याच योजनेअंतर्गत आम्ही ८ एकर जमिनीवर सुमारे १० हजार केशर आणि इतर आंब्याची रोपे लावली होती. त्यात त्यांनी बदल केले आणि एक नवीन आंबा प्रकार तयार झाला. त्याला त्यांनी शरद मँगो असे नाव दिले. शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी त्यांच्या बागेतील आंब्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) नेते शरद पवार यांच्या नावावरून नाव दिले आहे.

घाडगे म्हणाले की, तीन किलो आंबे पिकवण्यासाठी आम्ही एकाच झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे कलम केले. यामध्ये केशर, केळी आंबा ( जो आंबा केळीसारखा दिसतो त्यामुळे त्यास केळी आंबा म्हटले जाते) आणि इतर विविध प्रयोगांचा समावेश आहे.पहिल्या बॅचमध्ये तीन किलो आंबे उत्पादन झाल्यामुळे बारामती कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांना माहिती देण्यात आली. फक्त शरद आंब्याला पेटंट मिळाले. आज हाच आंबा जगात चर्चेचा विषय ठरत आहे.

——————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here