राधानगरी : प्रतिनिधी
सकाळ पासून सुरू असलेल्या पावसामुळे रात्री १०.३ वा.राधानगरी धरणातील स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 व रात्री १०.०५ मिनिटांनी दरवाजा क्रमांक ३ उघडले गेले आहेत.यानंतर दरवाजा क्र. ५ हे ११:११ वाजता उघडले आहे.
धरणातून तिन्ही द्वारातून ४२८४ क्युसेक्स आणि BOT पॉवर हाऊसमधून १५०० क्युसेक्स, असा एकूण ५७८४ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी, मासेमारी करणारे व जलसंपदेसाठी काम करणारे नागरिकांनी नदी पात्रात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..