प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
शास्त्रानुसार जन्मपत्रिका, लग्न आणि कुंडली यांकडे पाहण्याचा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन यातून मिळतो.आपल्या आयुष्यात ‘नशीब’ आणि ‘प्रयत्न’ (कर्म) यांविषयी नेहमीच द्वंद्व असते. अनेकदा आपण जन्मपत्रिका किंवा कुंडलीला आपल्या नशिबाचा अंतिम निकाल मानतो. पण शास्त्राच्या सखोल अभ्यासातून असे लक्षात येते की, ज्योतिष हे आपल्याला बांधून ठेवणारे शास्त्र नसून ते ‘स्व’ची ओळख करून देणारे एक साधन आहे.
जीवनाचे तीन नकाशे: जन्मपत्रिका, लग्न आणि कुंडली
आपल्या आयुष्याचा प्रवास समजून घेण्यासाठी हे तीन महत्त्वाचे नकाशे आहेत
जन्मपत्रिका (The Blueprint): हा तुमच्या जन्माच्या वेळच्या आकाशाचा स्क्रीन शॉट आहे. यात तुमच्या मागील जन्मातील कर्मांचा साठा असतो, ज्याला आपण ‘प्रारब्ध’ म्हणतो. ही तुमच्या आयुष्याची मूळ स्क्रिप्ट आहे.प्रारब्ध कर्म म्हणजे ते कर्म ज्याच फळ या जन्मात मिळायला सुरुवात झाली आहे बलस्थान तुमच्या कमकुवत बाजू या सगळ्याचा तपशील यात असतो म्हणजे एक प्रकारे आपल्या कर्मांची बॅलन्स शीट जी आपण सोबत घेऊन आलो आहोत. जर स्क्रिप्ट आधीच लिहिलेली असेल तर मग आपल्या प्रयत्नांना काही अर्थ आहे की नाही याचा अर्थ असा नाही का की आपण फक्त पात्र आहोत तर तसे नसून जन्मपत्रिका तुमच्या आयुष्यातील फक्त शक्यता दर्शवते ती दाखवते की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या परिस्थितींना सामोरं जावं लागेल.
समजा तुमच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ असेल तर तुम्हाला आयुष्यात अनेक संघर्षांना सामोर जाव लागेल अशी एक शक्यता आहे आता परिस्थिती हे तुमचं कर्म आहे हो पण त्या संघर्षावर प्रतिक्रिया कशी द्यायची रागाने,धैर्याने की पळून जाऊन ही तुमची स्वतंत्र इच्छा आहे म्हणजे कर्म प्रवृत्ती निर्माण करते बंधन नाही. भूमिका साकार कारण्यासाठी प्रत्येक कलाकाराची एक शैली असते एक पद्धत असते काही जण आक्रमकपणे भूमिका करतात काही जण शांतपणे आपल्या आयुष्यात ही शैली कोण ठरवतं इथे लग्नपत्रिकेची भूमिका सुरू होते जन्मपत्रिका जर स्क्रिप्ट असेल तर लग्नपत्रिका म्हणजे ती भूमिका साकारण्यासाठी वापरल जाणार तुमचं ऑपरेटिंग सिस्टम किंवा इंटरफेस.
लग्नपत्रिका (The Operating System):वरती सांगितल्या प्रमाणे जन्मपत्रिका जर स्क्रिप्ट असेल, तर लग्नपत्रिका ही तुमची ती भूमिका साकारण्याची पद्धत आहे. जगाचा सामना करण्याची तुमची मूळ पद्धत ठरवते तुमचे व्यक्तिमत्व, आरोग्य आणि जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन ‘लग्न’ ठरवते.
समजा दोन व्यक्तींच्या जन्मपत्रिकेत राजयोग आहे म्हणजे यशाच वचन आहे पण एकाच्या लग्नपत्रिकेत लग्न मेष आहे ज्याचा स्वामी मंगळ आहे तर दुसऱ्याच लग्न तूळ आहे ज्याचा स्वामी शुक्र आहे आता मेष लग्नाचा चा व्यक्ती आपल्या यशापर्यंत एका योद्ध्याप्रमाणे संघर्ष करत स्पर्धा जिंकत पोहोचेल तो एक धाडसी उद्योजक बनेल. आणि या उलट दुसरा तूळ लग्नाचा व्यक्ती आपल्या कलेतून भागीदारीतून संबंधांमधून ते यश मिळवेल तो एक यशस्वी कलाकार किंवा डिप्लोमॅट बनेल. म्हणजे कर्म सारखंच होतं यशाचं पण लग्नामुळे ते कसं प्रकट झालं हे पूर्णपणे बदलून गेलं. अगदी कर्म कसं व्यक्त होईल हे लग्न ठरवतं म्हणजे लग्नपत्रिका.
कुंडली (The Time Table): कुंडली हा एक जिवंत सतत बदलणारा नकाशा आहे.ही स्थिर नाहीये. कोणता प्रोग्राम कधी ‘रन’ होणार, म्हणजेच आयुष्यातील घटना कधी घडणार (दशा आणि गोचर),दशा म्हणजेच ग्रहांचे काळ आणि गोचर म्हणजे आकाशात सध्या फिरणारे ग्रह या दोन्हींचा विचार या मध्ये केला जातो. केव्हा काय घडेल याच उत्तर कुंडली देते. जसे की गुरुची किंवा शुक्राची दशा आल्यावरच यशाच दार उघडेल,तसच पत्रिकेत आरोग्याच्या समस्यांशी शक्यता असेल पण शनी किंवा राहूची दशा आल्यावर त्या समस्या डोकवर काढतील. कुंडळी म्हणजे वेळेच शास्त्र आहे.ती योग्य वेळ आणि योग्य संधी ओळखायला मदत करते ऋषिमुनींनी ज्योतिष शास्त्राची निर्मिती भीती किंवा अवलंबित्व निर्माण करण्यासाठी केली नव्हती त्याची निर्मिती आत्मज्ञान म्हणजे सेल्फ नॉलेज योग्य वेळ साधणं आणि अनावश्यक दुःख कमी करण्यासाठी झाली होती. जेव्हा तुम्हाला कळतं की पत्रिकेत चंद्र कमजोर असल्यामुळे मनात भीतीची प्रवृत्ती आहे तेव्हा तुम्ही त्या भीतीला दोष देत नाही तर त्या प्रवृत्तीवर काम करायला लागतातुम्ही ध्यान मंत्र किंवा इतर साधना करून मनाला बळकट करता यात तुमची जागरूकता म्हणजे अवेरनेस वाढवता. एक जागरूक व्यक्ती वाईट काळात कमी त्रास भोगते आणि चांगल्या काळात नम्र राहते. ती ज्योतिषाचा वापर भीतीसाठी नाही तर तयारीसाठी करते.
ग्रह नियंत्रण करतात की फक्त दिशा दाखवतात?
एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे ग्रह आपले आयुष्य कंट्रोल करतात. ग्रह तुमच्या मनात विशिष्ट प्रवृत्ती निर्माण करू शकतात (उदा. राग किंवा भीती), पण त्या प्रवृत्तीला बळी पडायचे की धैर्याने सामोरे जायचे, ही तुमची ‘स्वतंत्र इच्छा’ (Free Will) आहे.
शास्त्र सांगते की, “ग्रह केवळ परिस्थिती निर्माण करतात, तुमची प्रतिक्रिया नाही.”ज्योतिष आपल्या खऱ्या स्वरूपावर म्हणजे आत्म्यावर ही काम करत नाही कारण आत्मा जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे तो त्रिगुणांपासून आणि कर्मांपासून अलिप्त आहे तो केवळ साक्षी आहे.
ज्योतिष काम करतं ते आपल्या सूक्ष्म शरीरावर सूक्ष्म शरीर म्हणजे आपलं मन बुद्धी चित्त आणि अहंकार
चित्त म्हणजे आपली स्मृती आणि कर्मांचा साठा जन्मपत्रिका या सूक्ष्म शरीराचा नकाशा आहे आपल्या आत्म्याचा नाही. आपला मधील जो खरा ‘मी’ आहे तो आत्मा आहे आणि आत्मा या सगळ्याचा साक्षी आहे. पण आपलं मन बुद्धी चित्त आणि अहंकार म्हणजे सूक्ष्म शरीर हे या ग्रहांच्या प्रभावाखाली येतं आणि आपण चुकून स्वतःला ते सूक्ष्म शरीर समजतो. आणि म्हणूनच आपल्याला ग्रहांचा प्रभाव इतका खरा वाटतो ग्रह आपल्या मनावर आणि अहंकारावर प्रभाव टाकतात आपल्या खऱ्या स्वरूपावर नाही ग्रहांच्या दशा काही नवीन घटना घडवत नाहीत. तुमच्या चित्तामध्ये तुमच्या सूक्ष्म शरीरात आधीपासूनच साठवलेल्या कर्मांना ऍक्टिव्हेट करतात.जी कर्म सुप्त अवस्थेत असतात त्यांना त्या जाग करतात आधीच फुटलेल्या अंकुरांना खत पाणी घालायचं काम करतात.
प्रारब्ध कर्म म्हणजे जमिनीतील बीज दशा म्हणजे येणारा ऋतू गोचर म्हणजे रोजच हवामान आपली स्वतंत्र इच्छा आणि कृती म्हणजे शेतकरी
शनीची महादशा लागली म्हणजे जणू काही हिवाळा सुरू झाला आता एक अजाण व्यक्ती एक अप्रशिक्षित शेतकरी या काळात थंडीने गारून जाईल तो नैराश्य आणि भीती अनुभवेल पण एक ज्ञानी साधक एक कुशल शेतकरी त्याच काळात काय करेल तो घरात बसून आत्मचिंतन करेल आपल्या साधनांमध्ये खोलवर उतरेल आणि अलिप्तता प्राप्त करेल आपली पत्रिका समजून घेण्याचा खरा हेतू काय आहे माहित आहे का ?
खरा उद्देश आहे. जगाला आणि परिस्थितीला दोष देणं थांबवून स्वतःला समजून घेणं आणि तेव्हाच खरा ज्योतिषाचा परिपक्व वापर तेव्हा होतो.
जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते ही माझी प्रतिक्रिया माझ्या पत्रिकेतील मंगळामुळे आहे किंवा ही भीती माझ्या चंद्रामुळे येत आहे असं म्हटल्याने काय होतं ती व्यक्ती त्या भावनेच्या पूर्णपणे अधीन राहत नाही ती त्या भावनेला साक्षी भावाने पाहू शकते तिच्यात आणि तिच्या प्रवृत्तीमध्ये एक अंतर निर्माण होतं
आणि फक्त त्या प्रवृत्ती बद्दल जागरूक होण्यामुळे आपल्यात फरक पडतो कारण एक महत्त्वाच आध्यात्मिक सत्य आहे जागरूकतेमुळे कर्माचा प्रभाव कमी होतो.
एकदा तुम्ही तुमच्या प्रवृत्तीला ओळखलत की तुम्ही त्या प्रवृत्तीच्या ताब्यात राहत नाही तुम्ही तिचे मालक बनता. तुम्हाला माहित असतं की ही फक्त एक प्रवृत्ती आहे माझं अंतिम सत्य नाही
अश्या स्थितीत पत्रिकेच महत्व कमी होत नाही त्या स्थितीत ग्रह फिरत असतात कर्म घडतं असते पण व्यक्ती मात्र आतून स्थिर होते. तर पत्रिका तिची भूमिका फक्त बदलते आणि ज्योतिष शाश्त्रामधील सर्व ग्रंथ हे त्त्या व्यक्तीसाठी केवळ एक संदर्भ ग्रंथ एक रेफरन्स बुक बनतात. याच उदाहरण म्हणजे
जस हवामान खात्याचा अंदाज पाहून आपण तयारी करतो पण त्या अंदाजाने घाबरून जात नाही तसच काहीस आहे. अंतिम सत्य हे आहे की तुमच्या पत्रिकेतला कोणताही ग्रह अगदी गुरु किंवा शनी सुद्धा तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली ग्रह नाहीत तर तुमची सर्वात मोठी शक्ती ही तुमची जागरूकताच (अवेरनेस) आहे.
कमी जागरूकतेत ग्रह देवांसारखे वाटतात जे तुमचं नशीब ठरवतात उच्च जागरूकतेत ते हवामानासारखे वाटतात ज्यानुसार तुम्ही नियोजन करता आणि जेव्हा जागरूकता पूर्ण होते तेव्हा कर्म संपत पत्रिकांचे महत्त्व कमी होतं आणि फक्त चैतन्य फक्त शुद्ध आत्मा शिल्लक राहतो.
तुमची सर्वात मोठी शक्ती तुमच्या पत्रिकेतील ग्रहात नसून तुमच्या ‘जागरूकतेत’ (Level of Awareness) आहे. ज्योतिष हा भीतीचा विषय नसून तयारीचा आणि स्व-सुधारणेचा मार्ग आहे.





