नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
“ बेटी बचाओ, बेटी पढाओ ” या धोरणाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं जानेवारी-२०१५ मध्ये ‘ सुकन्या समृद्धी योजना ’ सुरू केली. मुलींचं शिक्षण आणि विवाहाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी तसेच मुलींमध्ये बचतीची सवय रुजवण्यासाठी ही लघु बचत योजना सुरू करण्यात आली आहे. २०२४ पर्यंत देशभरात तब्बल ४.१ कोटी मुलींची खाती उघडली गेली आहेत.
योजनेचे फायदे
-
या योजनेत जमा होणाऱ्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळतं.
-
योजनेत मिळणारी अंतिम रक्कम पूर्णपणे करमुक्त (Tax-Free) असते.
-
आयकर कायदा कलम ८०-C अंतर्गत १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीला कर सवलत मिळते.
-
मुलगी १८ वर्षांची झाल्यावर शिक्षणासाठी किंवा कायदेशीर विवाह वय गाठल्यानंतर लग्नासाठी पैसे वापरता येतात.
-
२१ वर्षांची मुदत पूर्ण होईपर्यंत व्याज वाढत राहते. मुदतीनंतरही पैसे न काढल्यास व्याज जमा होत राहतं.
-
खातं भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत व खासगी बँकांमध्ये उघडता येतं.
-
स्थलांतर झाल्यास खातं दुसऱ्या ठिकाणी सहज ट्रान्स्फर करता येतं.
योजनेसाठी पात्र कोण ?
-
मुलीच्या जन्मानंतर दहा वर्षांच्या आत खाते उघडणं बंधनकारक आहे.
-
खातं केवळ मुलीच्या नावानं उघडलं जातं.
-
किमान ₹ २५० रक्कम भरून खाते सुरू करता येतं; वार्षिक जास्तीत जास्त ₹ १.५ लाख रक्कम जमा करता येते.
-
एका मुलीच्या नावाने एक खाते ; विशेष परिस्थितीत दोन खाती उघडण्यास परवानगी.
गुंतवणुकीचे परतावे (उदाहरणे )
-
दरमहा ₹ १,००० भरल्यास मुदतीनंतर सुमारे ₹ ५ लाख रक्कम मिळते.
-
दरमहा ₹ १२,५०० ( वर्षाला १.५ लाख ) भरल्यास मुदतीनंतर तब्बल ₹ ७१ लाख मिळू शकतात.
-
दरवर्षी ₹ ६०,००० भरल्यास २१ वर्षांनंतर ₹ २८ लाखांहून अधिक रक्कम मिळते.