कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरपदी भारतीय वंशाचे सबीह खान यांची नियुक्ती झाली आहे. त्यांची निवड जेफ विल्यम्स यांच्या जागी करण्यात आली आहे. तीस वर्षांपासून अॅपलमध्ये कार्यरत असलेले आणि सध्या ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहणारे खान या महिन्याच्या अखेरीस औपचारिकरित्या पदभार स्वीकारतील. जेफ विल्यम्स २०१५ पासून चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पदावर आहेत.
अॅपल इंक. (Apple Inc.) ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी इलेक्ट्रॉनिक्स, संगणक सॉफ्टवेअर आणि डिजिटल सेवा यामध्ये काम करते.
सबीह खान यांची पार्श्वभूमी :
जन्म आणि शिक्षण: १९६६ मध्ये मुरादाबाद. उत्तर प्रदेशमध्ये जन्म. सिंगापूरमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर अमेरिका गेले
शैक्षणिक पात्रता: टफ्ट्स युनिव्हर्सिटीमधून इकॉनॉमिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये दोन पदव्या आणि आरपीआयमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पूर्ण केलं आहे
करियर:जीई प्लास्टिक कंपनीत अॅप्लिकेशन्स डेव्हलपमेंट इंजिनीयर म्हणून त्यांनी काम केले. १९९५ मध्ये अॅपलमध्ये प्रोक्युअरमेंट टीममध्ये ते रुजू झाले. २०१९ पासून त्यांनी सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट, ऑपरेशन म्हणून कार्यरत आहेत.
सबीह खान यांचे अॅपलमध्ये योगदान :
जागतिक पुरवठा साखळी (supply chain) आणि ऑपरेशन्स व्यवस्थापन.
पर्यावरणीय धोरण आणि सप्लायर जबाबदारीचे कार्यक्रम – कार्बन फुटप्रिंट ६० टक्केने कमी करण्यात योगदान.
कोव्हीड-१९ काळात लवचिकता आणि उत्पादन क्षमता टिकवण्याची ताकद वाढविणे.
यूएस उत्पादनावरही त्यांनी भर दिला.
अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी सबीह खान यांच्या पर्यावरणीय शाश्वततेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले असून अॅपलचा कार्बन फूटप्रिंट ६० टक्क्यांहून अधिक कमी करण्यात त्यांच्या प्रयत्नांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशे त्यांनी म्हंटले आहे.
खान यांची ही बढती भारतास विशेष महत्त्वाच्या काळात झाली आहे, ज्या वेळी अॅपल भारतात उत्पादन वाढवून भारताला जागतिक उत्पादन आणि विक्रीच्या धोरणात सामील करत आहे .