कोल्हापूर : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी अरुण रामचंद्र सोनवणे यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. समाजसेवा, व्यावसायिक दृष्टिकोन आणि राजकीय क्षेत्रात उदयास येत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले सोनवणे हे कोल्हापुरात तरुण उद्योजक म्हणून प्रसिध्द आहेत.
क्रेन सर्व्हिसेस व्यवसायाबरोबर महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी करत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला आहे. कोल्हापुरातील गणेश विसर्जनात क्रेनच्या सहाय्याने मोठ्या मूर्ती अत्यंत सुसज्ज पद्धतीने उचलून थेट खाणीत विसर्जित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या तीन चार वर्षापासून त्यांचे काम अविरतपणे चालू आहे. तसेच विमानतळ विस्तारीकरण बाधित शेतकऱ्यांच्यासाठी यशस्वी लढा देत त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
आज अरुण सोनवणे यांना वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करून ही निवड करण्यात आली. पक्षातील नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.