अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
139
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी / विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम १ ते  किंवा ५ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दिनांक २० जुलै २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडाळाचे (मर्या) जिल्हा व्यवस्थापक प्रशांत तेलंग यांनी केले आहे.
कागदपत्रे – 
  • अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी हस्तलिखित अर्ज, 
  • सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची मार्कलिस्ट, 
  • शाळा सोडल्याचा दाखला, 
  • जातीचा दाखला, 
  • पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, 
  • रेशनकार्ड, व आधारकार्ड इ. कागदपत्रे सादर करावीत. 
  • दिलेल्या मुदतीनतंर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
इच्छुक जातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी दि. २० जुलै २०२५ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, डॉ. बाबर हॉस्पिटलच्या मागे, सदर बाजार ताराराणी पुतळा जवळ, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावेत.

———————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here