spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeसामाजिकजीएसटी स्लॅबसह पेन्शन नियमांमध्ये सुधारणा

जीएसटी स्लॅबसह पेन्शन नियमांमध्ये सुधारणा

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

दिवाळीपूर्वी मोदी सरकारने देशातील जनतेसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा करून दिलासा दिला आहे. यामुळे सर्वसामान्य घरगुती बजेट पासून ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्याची हमीपर्यंत मोठा बदल होणार आहे.

जीएसटी स्लॅबमध्ये बदल
केंद्र सरकारने जीएसटीच्या संरचनेत मोठा बदल करत २८ टक्के आणि १२ टक्के असे दोन स्लॅब रद्द केले आहेत. आता केवळ १८ टक्के आणि ५ टक्के असे दोनच स्लॅब राहणार आहेत. या निर्णयामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा कमी होणार असून त्या वस्तू आणखी स्वस्त होणार आहेत. परिणामी थेट जनतेच्या खर्चात कपात होणार आहे.
पेन्शन नियमांमध्ये सवलत
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, नव्या नियमांनुसार आता केवळ २० वर्ष नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर सर्व लाभांसह पेन्शन मिळणार आहे. यापूर्वी फक्त २५ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच हा लाभ मिळायचा. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून मागणी होत होती. अखेर दिवाळीपूर्वी सरकारने ही मागणी मान्य करून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
महत्त्वाची तरतूद
यासोबतच नव्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली असेल आणि त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आलं असेल, तर अशा कर्मचाऱ्यांना युपीएसमधून एनपीएसमध्ये रूपांतर करता येणार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जीएसटी स्लॅबमध्ये केलेला बदल आणि पेन्शन नियमांमध्ये सुधारणा या दोन मोठ्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिवाळीपूर्वी दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारकडून दिलेलं हे दुहेरी गिफ्ट देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

———————————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments