चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
प्रेक्षकांना दोन तास खळखळून हसायला लावणारा आणि सहकुटुंब पाहावा असा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट २७ जूनपासून महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील सर्व चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे. ही कलाकृती निश्चितपणे प्रेक्षकांना आवडेल,’ असा विश्वास दिग्दर्शक योगेश जाधव यांनी व्यक्त केला. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाविषयी माहिती दिली.
निर्मात अमोद मुचंडीकर, वाणी हालपन्नवर, कॅमेरामन मयुरेश जोशी यांनीही या चित्रपटाविषयी मनोगत व्यक्त केली. मैत्रीसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या तरुणाईची कथा असलेला हा चित्रपट कलाकारांच्या सुरेख अभिनय, सुमधुर संगीत आणि नेत्रसुखद सादरीकरण असणार आहे.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. त्यांच्यासोबत सयाजी शिंदे, अभिजित चव्हाण आदी कलाकार आहेत. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहन केले आहे.
———————————————————————————————-