कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हाध्यपदी संजय साबळे तर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मनिषा डांगे यांची अधिकृत निवड झाली. परिषदचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ. शरद गोरे (पुणे) यांनी ही नियुक्ती अधिकृतपणे जाहीर केली असून, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारुती पाटील यांच्या शिफारशीवरून ही दोनही निवडी झाल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष संजय गोपाळ साबळे – हे साहित्य, शिक्षण आणि सामाजिक जाणिवांचे समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व असून सहाय्यक शिक्षक म्हणून चंदगड येथे कार्यरत आहेत.मराठी भाषा, विद्यार्थी घडवणं, ग्रामीण साहित्यिक वाटा दृढ करणं यामध्ये त्यांचे योगदान आहे. त्यांच्या कार्यशक्तीला आणि शिस्तप्रिय नेतृत्वगुणांना दाद देत, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी साहित्य चळवळीला नवी दिशा आणि नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
महिला जिल्हाध्यक्ष मनिषा उदय डांगे – या प्रशासन, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समाजभान यांचं भान असणाऱ्या आहेत. त्यांची पाचशे पेक्षा जादा व्याख्याने व कथाकथन कार्यक्रम केले असून विद्यार्थ्यांना कौशल्य व नैतिक मार्गदर्शन करतात. महिला विषयक कार्यशाळा आणि मोफत वैयक्तिक कौन्सेलिंग ‘कळी उमलताना’ यांसारख्या विषयांवर सत्रांचे आयोजन करतात.तसेच त्यांचे स्वतःचे ‘ज्ञान आणि संस्कार’ यूट्यूब चॅनल आहे.
या दोन ही निवडी म्हणजे साहित्य परिषदेसाठी केवळ पदनियुक्त्या नाहीत, तर त्या सृजनशील विचार, सामाजिक भान, आणि प्रेरणादायी नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहेत.
——————————————————————————————-



