कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ दिले जाणारे ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा १४ जून रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्य मंदिर,माटुंगा इथं होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार असणार आहेत. उद्योगमंत्री , अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे.
व्यावसायिक नाट्य पुरस्कार
सर्वोत्कृष्ट लेखक सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (नाटक : उर्मिलायन), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अद्वैत दादरकर (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनाकार शीतल तळपदे (नाटक : मास्टर माइंड), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार निषाद गोलांबरे (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार राजेश परब (नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक असेन मी नसेन मी (संस्था : स्क्रीप्टज क्रिएशन), सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रशांत दामले (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हृषीकेश शेलार (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुलकर्णी (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शर्मिला शिंदे (नाटक : ज्याची त्याची लव स्टोरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शुभांगी गोखले (नाटक : असेन मी नसेन मी) आणि अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार निहारिका राजदत्त (नाटक : उर्मिलायन), नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार श्री. सुशांत शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत आनंदमठ (संस्था : कल्पक ग्रुप, पुणे), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक मिडिआ (संस्था : रुद्रेश्वर, गोवा), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक मुकुल ढेकळे (सं. नाटक : मून विदाऊट स्काय), सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार यशवंत चोपडे (सं. नाटक : ब्लँक इक्वेशन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पूनम सरोदे (सं. नाटक : वेटलॉस) प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (सं. नाटक : संगीत अतृप्ता) प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे ( सं. नाटक : संगीत आनंदमठ), प्रायोगिक सर्वोत्कृष्ट नाटक लेखक डॉ. सोमनाथ सोनवळकर (सं. नाटक : द फिलिंग पॅरोडॉक्स) यांची निवड करण्यात आली.



