पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
विदर्भातील स्थिती – विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडणार असून, काही भागात जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.
पुढील चार दिवसांचा अलर्ट
१३ ऑगस्ट
-
ऑरेंज अलर्ट – यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
-
यलो अलर्ट – अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे, पालघर
१४ ऑगस्ट
-
ऑरेंज अलर्ट – नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ
-
यलो अलर्ट – अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे, पालघर
१५ ऑगस्ट
-
ऑरेंज अलर्ट – यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, रत्नागिरी
-
यलो अलर्ट – नागपूर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अहमदनगर, पुणे, रायगड, सातारा, ठाणे, पालघर
१६ ऑगस्ट
-
ऑरेंज अलर्ट – बुलढाणा, अकोला, अमरावती, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे
-
यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, कोल्हापूर
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, नद्या-ओढ्यांमधील पाणी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी हलण्याचे आणि वीजांच्या कडकडाटादरम्यान घराबाहेर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
——————————————————————————————-