कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आजपासून देशात काही महत्त्वाचे आर्थिक आणि व्यवहारिक बदल लागू होत आहेत. व्यायावसायिक सेवा व वस्तूंच्या दारात काही बदल करण्यात येत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत अनेक घटकांवर याचा परिणाम होणार आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी :
आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ३४.५० रुपयेची कपात करण्यात आली आहे. ही दर कपात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आणि इतर व्यावसायिक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडर्ससाठी लागू असेल. यामुळे व्यवसायिकांना थेट आर्थिक फायदा होणार असून खाद्यपदार्थांच्या किमतीवर याचा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे.
युपीआय अॅप्सवर बॅलन्स तपासणीवर मर्यादा :
युपीआयआय (Unified Payments Interface) अॅप्लिकेशन्सवर बँक बॅलन्स तपासण्यासाठी आता मर्यादा लागू करण्यात आली आहे. एका दिवसात निश्चित संख्येनेच बॅलन्स चेक करण्याची सुविधा वापरता येणार आहे. यामुळे युपीआयआय सर्व्हर्सवरील लोड कमी होणार असून फसवणूक रोखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दिवसाला केवळ ५० वेळा बॅलेन्स चेक करता येणार आहे.
इतर बदल :
आता ऑटो पे जसे की, ईएमआय, सबस्क्रिप्शन किंवा बिल पेमेंट ठराविक वेळेतच करता येणार आहे. यासह विमानात वापरलं जाणारं इंधन महागलं असल्याने विमान प्रवास आता महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानप्रवास करणाऱ्यांच्या खिशला कात्री लागणार आहे. एसबीआयकडून काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील मोफत हवाई अपघात विमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
————————————————————————————-