आषाढी वारीत एआय तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग

२७ ते २८ लाख भाविकांची गर्दी

0
100
Google search engine

पंढरपूर : प्रसारमाध्यम न्यूज

यंदाची आषाढी वारी इतिहासात विक्रमी ठरली असून, याचे ठोस पुरावे यंदा वापरण्यात आलेल्या एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) तंत्रज्ञानातून समोर आले आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत तब्बल २७ ते २८ लाख भाविकांचा हेडकाउंट नोंदवण्यात आला असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

वारीच्या दिवशी पंढरपूर नगरीत जिकडे नजर जाईल तिकडे फक्त भाविकांचा महासागर दिसत होता. मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती, असे चित्र होते. यंदाच्या गर्दीने आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत.
पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर
गर्दीचे अचूक मोजमाप करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच ड्रोन आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. चंद्रभागा घाट, दर्शन रांगा, मंदिर परिसर, शहराचे प्रवेशद्वारे अशा सहा प्रमुख भागांवर ड्रोन उडवण्यात आले. त्यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार २७ ते २८ लाख भाविक पंढरपूरमध्ये उपस्थित होते.
वाहतूक नियोजनात एआयचा मोठा उपयोग
विशेष म्हणजे आज द्वादशीच्या पहिल्या सहा तासांतच ९५ टक्के भाविक आणि वाहने शहराबाहेर पडली. त्यामुळे आता पंढरपूर मोकळे झाले आहे. यासाठी शहराच्या सहा प्रमुख मार्गांवर डीवायएसपी दर्जाचे अधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. योग्य वाहतूक नियोजनामुळे लाखो भाविकांना शहराबाहेर जाताना कुठेही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही. यामध्येही एआय तंत्रज्ञानाचा उपयोग झाला असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
माऊली पथकाचे कडक नजर ठेवणे
वारीच्या काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी माऊली पथक कार्यरत होते. गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या जवळपास १८० चोरांना माऊली पथकाने ताब्यात घेतले. तसेच, चुकलेल्या जवळपास २७०० भाविकांना पुन्हा त्यांच्या नातेवाईकांसोबत जोडण्यात आले.
अपघातमुक्त आणि सुरळीत वारी
एकेरी वाहतूक व्यवस्थेमुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, वाळवंट या भागात कुठेही चेंगराचेंगरी किंवा मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या नाहीत. संपूर्ण वारी कालावधीत कोणतीही दुर्दैवी घटना नोंदवली गेली नसल्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
भव्य वाहतूक आणि सोयीसुविधा
वारीसाठी यंदा तब्बल ५० हजारांहून अधिक ट्रक, टेम्पो, कार आणि खाजगी वाहने, ६ हजारहून अधिक एसटी बसेस आणि १०० विशेष रेल्वे फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

वारीतील गर्दीचे व्यवस्थापन, एआय तंत्रज्ञानाचा वापर, चोख पोलीस बंदोबस्त आणि माऊली पथकाचे सतर्कतेमुळे यंदाची आषाढी वारी विक्रमी आणि यशस्वी ठरली. पंढरपूर नगरीतील या ऐतिहासिक यात्रेचा अनुभव भाविकांसाठी सुखकर आणि सुरक्षीत ठरला.

कोल्हापूर जिल्ह्यातील आद्य पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळ येथील मंदिराचे महात्म्य पहा..खालील लिंकवर….👇

————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here