कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यावर्षी उत्तरपत्रिका तपासणे आणि अंतिम निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे एआयचा वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग करण्यात आला.
छोट्या गटावर करण्यात आलेल्या या प्रयोगाचे निकाल उत्साहवर्धक आहेत. यामुळे हे एआय मॉडेल अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत होईल, असा विश्वास ग्लोबल टीचर प्राईज विजेते रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील १२ जिल्हा परिषद शाळांमधील २२५ विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने तपासून, अंतिम निकाल लावण्याचा संशोधन प्रकल्प नुकताच पूर्ण केला. या प्रयोगात २२५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संबंधित वर्गाचे शिक्षक व एआय अशा दोन्ही पद्धतीने तपासण्यात आल्या. एआयच्या माध्यमातून तपासण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांमधून १२ टक्के मुलांच्या गुणात बदल झाल्याचे दिसून आले. हे बदल संबंधित शिक्षकांच्या तपासणीत अचूक असल्याचे दिसून आले.
———————————————————————————



