राधानगरी : प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील कुडुत्री येथे कृषी विभाग राधानगरी आणि आत्मा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत भात लागवड आणि हुमणी कीड नियंत्रण प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या हुमणी कीड नियंत्रण स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उपविभागीयी कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी,तंत्रज्ञान जेव्हा शेतकऱ्यापर्यंत जातं,ते जेव्हा अवगत करतात त्यावेळी काय घडतं, हे प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातून दाखवून दिले आणि कृषी विभागाचं संशोधित तंत्रज्ञान वापरत शेती मध्ये भरघोस उत्पन्न घेता येत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भातपीक संशोधन शास्त्रज्ञ शैलेश कुंभार यांनी बीजप्रक्रिया,चिखल कसा असावा,रोपातील अंतर किती असावं,मूलद्रव्य उपलब्धता,हिरवळीची आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्या बाबत माहिती दिली. शास्त्रज्ञ अभयकुमार बागडी यांनी,हुमणी,गोगलगाय नियंत्रणासाठी संशोधित नियंत्रण प्रक्रियेची माहिती दिली.मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे यांनी शेतकऱ्यांची स्पर्धा भरवुन ३४ हजार ५२७ सत्तावीस भुंगे जमा करू शकलो,यामुळं सतरा लाख हुमणी अळ्या कंट्रोल झाल्याचं सांगितलं.
यावेळी आत्मा समिती सदस्य दीपक शेट्टी,तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे,मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे, रणजीत गोंधळी सहायक कृषी अधिकारी युवराज पोवार,अमोल कांबळे,एम एस कांबळे सविता बकरे मानोज गवळी,राहुल पाटील,निकिता तिलगामे,निखिल पाटील सरपंच शिवाजी चौगले,शांताराम बुगडे, आत्माचे सुनील कांबळे यांच्यासह तालुक्यातील भात उत्पन्न घेणारे शेतकरी उपस्थित होते.