कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूरसह राज्यात यावर्षी मे पासून पाऊस सुरु झाला आहे. वळीव, अवकाळी पाऊस असला तरी एकसारखा पडत आहे. महिन्याभरात अतिवृष्टी, ढगफुटीही जिल्यात, कोल्हापूर शहरात झाली. अशा पावसामुळे पावसाळा कधी सुरु झाला हे समजलेच नाही. यावर्षी खरीपाची मशागत करायला शेतकऱ्याना संधीच मिळाली नाही. मशागत करायच्यावेळी शेतात पाणी साचलेले होते. पाऊस एकसारखा पडत असल्यामुळे जिल्यातील निम्मे बंधारे २० जून पर्यत भरले. राधानगरी, काळम्मावाडी धरण २० जून पर्यंत ५० टक्क्यापेक्षा जास्त भरल्याने धरणातून विसर्ग जास्त प्रमाणात केला गेल्याने कोल्हापूरमध्ये पंचगंगेला २४ जूनलाच पूर आला. अशी स्थिती यापूर्वी २००५ मध्ये निर्माण झाली होती.
जून २००५ मधील महाराष्ट्रातील महापुर ही ही एक ऐतिहासिक नैसर्गिक आपत्ती होती, ज्यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्हे यामध्ये पुराचा मोठा फटका बसला. खाली या महापुराची प्रमुख वैशिष्ट्ये दिली आहेत
जून २००५ च्या महापुराचे वैशिष्ट्ये :
अतिवृष्टी: जून २००५ मध्ये अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी २४ तासात २०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
नद्यांचे पुर: कृष्णा, पंचगंगा, कोयना, वर्धा, वैनगंगा अशा प्रमुख नद्यांना पूर आला. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
धरणांचा जलसाठा भरलेला: पावसामुळे कोयना, वारणा, अलमट्टी इ. धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला आणि पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे नदीखोऱ्यात पूरपरिस्थिती अधिक गंभीर झाली.
वाहतूक आणि दळणवळण बंद: अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले. कोल्हापूर-पुणे महामार्ग, आणि रेल्वेसेवा काही दिवस ठप्प झाली होती.
मानवी व आर्थिक हानी: अनेक गावांमध्ये पूराचे पाणी घरात शिरले. हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले. शेती, जनावरे, घरे, वाहने इ. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आपत्कालीन मदतकार्य: राज्य सरकार, एनडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाने मदतकार्य राबवले. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
जून २०२५ च्या महापुराचे वैशिष्ट्ये :
दीड महिन्यापासून १२ मे पासून सलग पाऊस. कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी.
- नृसिंहवाडीला २४ मे रोजी रात्रीच दक्षिणद्वार सोहळा .
- राधानगरी, काळमावाडी धरण ५० टक्क्याहून अधिक २० जूनपर्यंत भरली. यामुळे विसर्ग वाढविला.
- कोल्हाप्रातील काही घारात, व्यवसायाच्या ठिकाणी पाणी श्रले.
- कळंबा तलाव २५ जूनलाच भरला.
- शेतीची मशागत करायला वेळच मिळाला नाही.शेतात पाणी साचल्याने खरीपाची पेरणी रेंगाळली.
- निम्म्याहून अधिक बंधारे भरली.
- काही भागांत लोकांना स्थलांतरित करण्यात आले, तसेच सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
- ५६ बंधारे पाण्याखाली.
————————————————————————————————



