भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी अमोल येडगे

0
145
District Collector Amol Yedge, District Superintendent of Police Yogesh Kumar Gupta, Commissioner K. Manjulaxmi, and Shivraj Nayakwade of the Devasthan Committee reviewed the ongoing preparations for the Navratri festival in the temple premises.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

भाविकांचे दर्शन सुलभ होईल त्या अनुषंगाने सर्व व्यवस्था देवस्थान समिती, महानगरपालिका यांच्या मार्फत करण्यात आलेल्या आहेत. भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी दर्शन रांगा, ऊन आणि पावसापासून बचावासाठीची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंदिर परिसरात भेटी दरम्यान दिली.

भाविकांचे दर्शन विना अडथळा व्हावे यासाठी काही सागवानचे प्लायवूड सुद्धा मंदिर परिसरात लावण्यात येत आहेत. या वर्षी गर्दी व्यवस्थापनासाठी एआयचा वापर करण्यात येणार आहे, त्या कंट्रोल रूमचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलेले आहे. आवश्यक अतिक्रमण काढण्याचे काम महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन व गर्दीच्या अनुषंगाने आवश्यक काही स्टॉलही दहा दिवसांसाठी हटविण्यात येणार आहेत.

लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मंदिर बाह्य परिसर, दर्शन रांगा, मनकर्णिका कुंड परिसर, मंदिराच्या आतील दर्शन मार्ग या ठिकाणची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधितांना दिल्या.

वाहनतळ ते मंदिर परिसर भाविकांसाठी केएमटी मार्फत एसी व इतर बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात शहराच्या बाजूला व अंतर्गत वाहन तळांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणाहून भाविकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे मंदिर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर येता येणार आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी वाहन तळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या १५ वाहनताळ ठिकाणी ६४ स्वच्छतागृह व मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी दिली. या भेटी दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या वाहनताळांची पाहणीही केली.

उपस्थिती – जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, देवस्थान समितीचे शिवराज नायकवडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह व्यवस्थेतील संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
————————————————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here