आराध्यासाठी अभी-ऐशने खरेदी केला इतक्या रुपयांचा हॉलिडे होम

0
97
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम :

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे इंडस्ट्रीतले सदा चर्चेत राहणारे जोडपे आहे. त्यांनी अलीकडेच त्यांचा लग्नाचा १८ वा वाढदिवस साजरा केला, त्यानिमित्त ऐश्वर्याने अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतचा सर्वात सुंदर फोटो शेअर केला आहे. हे जोडपे कामामुळे त्यांचा बहुतेक वेळ मुंबईतील जुहू येथील घरी घालवतात, परंतु ते त्यांच्या कामासाठी खूप प्रवास देखील करतात.

अनेकवेळा ते कामातून मोकळा वेळ मिळाल्यावर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशवारी देखील करतात. तुम्हाला माहिती आहे का की त्यांचे दुबईमध्ये हॉलिडे होम देखील आहे? अभिषेक ऐश्वर्याच्या  दुबईतील  मालमत्तेबद्दल जाणून घेऊ. इंडेक्स टॅपच्या वृत्तानुसार, दुबईतील त्यांचा आलिशान व्हिला या जोडप्याने २०१५ मध्ये खरेदी केला होता. तो जुमेराह गोल्फ इस्टेटमधील पॉश सँकच्युअरी फॉल्समध्ये आहे. या हॉलिडे होममध्ये एक मोठी बाग, स्विमिंग पूल आणि गोल्फ कोर्स आहे. या घराची किंमत सुमारे १६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

शाहरुख आणि शिल्पा शेजारी
शाहरुख खानपासून शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटी ऐश्वर्या आणि अभिषेकचे शेजारी आहेत. २८० कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या अभिषेकने मुलगी आराध्यासाठी गुंतवणूक म्हणून दुबईतील हा व्हिला खरेदी केल्याचे बोलले जाते. ऐश्वर्याची एकूण संपत्ती ७७६ कोटी रुपये आहे. परदेशात मालमत्ता आणि दुबईतील घराव्यतिरिक्त, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्याकडे मुंबईतही अनेक मालमत्ता आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here