प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
हर कुत्ते का दिन आता है हा डायलॉग सामान्य जीवनात खरा ठरवत, आलोका नावाच्या कोलकात्याच्या रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानाने सिद्ध केलं आहे. या श्वानाचे नाव बौद्ध भिक्खूंनी ‘आलोका’, ज्याचा अर्थ आहे ‘प्रकाश’. असे ठेवले असून तो त्या बौद्ध भिक्खूंच्या गटाला कोलकत्ता मध्ये भेटला भिक्खूंनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्याचा प्रयत्नही केला, पण आलोका त्यांचा साथ सोडायला तयार नव्हता. तो त्यांच्यासोबत शांती आणि अहिंसेच्या मार्गावर निघाला. आलोकाने भिक्खूंसोबत बोधगया, सारनाथ, कुशीनगर आणि वैशाली यांसारख्या अनेक पवित्र बौद्ध स्थळांची पायी यात्रा केली.
आलोकाची ही गोष्ट डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान सुरू होते. जेव्हा अमेरिकेतील बौद्ध भिक्खूंचा एक गट ११२ दिवसांच्या ‘शांती यात्रे’साठी भारतात आला होता. या प्रवासादरम्यान कोलकाताच्या रस्त्यांवर या भिक्खूंची भेट अडीच वर्षांच्या आलोकाशी झाली. भिक्खूंना पाहताच आलोकाला जणू आपले कोणीतरी भेटल्यासारखे वाटले आणि कोणत्याही निमंत्रणाशिवाय तो त्यांच्या प्रवासात सामील झाला.त्याच्या या कर्तृत्वाने त्याला वर्ल्ड पीस डॉग’ म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. फक्त शांततेचा सोंग आणणाऱ्या सोंगाड्या डोनाल्ड ट्रम्प यांनी या अलोका कडून शिकण्यासारखे आहे चांगली कर्म केली कि आपोआप त्याचे फळ मिळते त्यासाठी तोंड उघडावे लागत नाही किंवा स्वतः चा उदोउदो करून शांततेचा नोबल मिळवण्याची केविलवाणी धडपड करून चालत नाही. असो तो श्वान आलोका भारताचा आहे.त्याचे संस्कार अमेरिकेच्या ट्रम्प ना समजणे अवघड आहे. त्याना फक्त टेरिफ वाढवायला जमते.
आज आलोका भारताच्या सीमा ओलांडून अमेरिकेत पोहोचला असून तिथल्या ‘Walk for Peace’ मोहिमेचा चेहरा बनला आहे. गेल्या महिन्यात भिक्खूंनी त्याचे सोशल मीडिया अकाउंट सुरू केले, ज्याचे आता ७३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सध्या आलोका टेक्सस (Texas) ते व्हाईट हाऊस (White House) पर्यंतची ३,७०० किलोमीटर लांब यात्रा करत आहे. तो दररोज भिक्खूंसोबत पायपीट करतो आणि रात्री त्यांच्यासोबतच तंबूत चटाईवर झोपतो. आलोकासाठी हा प्रवास सोपा नव्हता. वाटेत अनेक भटक्या कुत्र्यांनी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला, तो आजारी पडला, इतकेच नाही तर एका कारची त्याला धडकही बसली. पण आलोका डगमगला नाही. तो प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहिला आणि त्याच जिद्दीने भिक्खूंसोबत चालत राहिला.
बौद्ध भिक्खूंच्या मते, आलोका त्याच्या पूर्वजन्मीच्या चांगल्या संस्कारांमुळेच या आध्यात्मिक प्रवासात सामील झाला आहे. आज काही डॉक्टर्स भारतीयांच्या टॅक्स वर शिकून Rx (औषधाच्या चिठ्ठी) लिहायच सोडून RDX लिहुन भारतामध्येच बॉम्बस्फोट घडवून जिहाद करत असताना कोलकात्याच्या हा आलोक श्वान जगभरात ‘Walk for Peace’ मोहिमेचा चेहरा बनला आहे.यावरून असेच वाटते कि कुत्रा हा खरचं माणसा पेक्ष्या इमानदार प्राणी आहे.ज्यांचं खातो त्याची जाण पण ठेवतो. सध्या Ai च्या जगात कॉम्प्युटर आणि प्राणी माणसाचे काम करत आहेत आणि माणसे प्राण्यांसारखी वागत आहेत.





