spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeइतिहासबहुआयामी अभिनयाची ठसठशीत छाप

बहुआयामी अभिनयाची ठसठशीत छाप

अभिनेते दिनकर इनामदार यांचा आज स्मृतिदिन

प्रसारमाध्यम विशेष
आज १२ ऑगस्ट. अभिनेते दिनकर इनामदार यांचा स्मृतिदिन. झपाटलेला, इरसाल कार्टी,  मर्दानी, मराठी बटालियन, ओवाळणी, चोराच्या मनात चांदणं, ज्योतिबाचा नवस अशा चित्रपटातून दिनकर इनामदार झळकले होते. झपाटलेला चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरमालकाची म्हणजेच ‘ धनाजीराव धनवडे ‘ ची भूमिका बजावली होती. अभिनेत्री अलका इनामदार या त्यांच्या पत्नी होत. अलका इनामदार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई म्हणून बऱ्याच चित्रपटात काम केले होते. 
दिनकर इनामदार व अभिनेत्री अलका इनामदार
मराठी चित्रपटसृष्टीत ८०-९० च्या दशकात आपल्या वेगळ्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवणारे नाव म्हणजे दिनकर इनामदार. विनोदी, खलनायक, साधा-भोळा गावकरी किंवा हटके स्वभावाची व्यक्तिरेखा  कोणतीही भूमिका त्यांनी सहजतेने रंगवली. त्यांच्या डोळ्यातील मिश्कील भाव, संवादफेकीतील ठामपणा आणि प्रसंगानुरूप चेहऱ्यावर येणारा भावनिक ओलावा ही त्यांची खासियत होती.
चित्रपटसृष्टीतील प्रवास
दिनकर इनामदार यांचा अभिनय प्रवास रंगभूमीपासून चित्रपटापर्यंत पोहोचला. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी एकापेक्षा एक लक्षवेधी भूमिका साकारल्या.
त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये – कलावंतीण, इरसाल कार्टी, ओवाळणी मर्दानी, मराठी बटालियन, चोराच्या मनात चांदणं. ज्योतिबाचा नवस यांचा समावेश होतो.
विशेष म्हणजे, ‘झपाटलेला’ या महेश कोठारे दिग्दर्शित सुपरहिट चित्रपटातील ‘धनाजीराव धनवडे’ ही त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरमालकाच्या भूमिकेत त्यांनी अप्रतिम टायमिंग आणि भावमुद्रांनी हशा पिकवला. विशेषत: बोलक्या बाहुल्यांच्या खेळाद्वारे धनाजीरावांची टिंगल करणारा प्रसंग आजही लोकांच्या आठवणीत ताजा आहे.
राजकारणातील वाटचाल
अभिनयासोबत त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता. दिनकर इनामदार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले. लोकांशी जवळीक, मदतशील स्वभाव आणि थेट संवादशैली यामुळे ते परिसरात लोकप्रिय झाले. कोल्हापूरच्या महानगरपालिकेत त्यांच्या पत्नी अलका इनामदार नगरसेविकेच्या पदाचा भार त्यांनी सांभाळला होता. अलका आणि दिनकर इनामदार यांना संजय आणि विनोद ही दोन अपत्ये आहेत. संजय इनामदार हे कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकारी पदी कार्यरत राहिले आहेत. 
दिनकर इनामदार यांचे १२ ऑगस्ट २००५ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीने एक मनमोकळा, हसरा आणि बहुगुणी कलाकार गमावला. त्यांच्या पत्नी अलका इनामदार यांचे निधन त्याच्या आधीच झाले होते, आणि त्या दुःखातून ते फारसे सावरू शकले नाहीत.

आजही ‘झपाटलेला’तील धनाजीराव धनवटेचा बडबड्या आणि लाडिक अंदाज, कलावंतीण व इरसाल कार्टीतील ठसठशीत भूमिका, तसेच गावकडच्या बोलभाषेत केलेली संवादफेक – हे सगळं मराठी चित्रपटप्रेमींच्या आठवणीत कायम आहे. दिनकर इनामदार यांचे कार्य हे मराठी सिनेसृष्टीच्या सुवर्णपानांपैकी एक आहे.

———————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments