कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय प्रसिद्ध डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी आरोग्य क्षेत्रात ठळक कार्य आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये डॉ. रॉय यांनी मुख्यमंत्री असताना अनेक वैद्यकीय संस्था उभारल्या. महात्मा गांधींचे वैद्य म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी – १ जुलैला झाला. त्यांच्या कार्याचे जागरण आणि डॉक्टरांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी म्हणून १ जुलै हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो.
डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म पटना येथे झाला. ते कॉलकत्ता मेडिकल कॉलेजमधून एलएमएस (१९०६), एम.डी. (१९०८) आणि इंग्लंडमधून १९११ मध्ये पुढील वैद्यकीय शिक्षण घेतले. डॉ. रॉय प्रसिद्ध डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वैद्यकीय क्षेत्रातील वाटचाल :
डॉ. रॉय ब्रिटनमधून परतल्यावर ते थेट कॅम्पबेल व कार्मायकेल मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापक आणि प्रगत वैद्य म्हणून कार्यरत राहिले. १९२८ मध्ये भारतीय वैद्यकीय संस्था (IMA) स्थापनेत त्यांचा वाटा मोलाचा होता. या संस्थेचे १९३९ ते ४५ पर्यंत ते अध्यक्ष होते. कॉलकत्ता येथे त्यांनी जादवपुर टी.बी. हॉस्पिटल, चित्तरंजन सेबा सदन, कमला नेहरू रुग्णालय, चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल यासह अनेक आरोग्य केंद्रांची स्थापना केली केली. प्रगत वैद्यकीय शाळेची सुरुवात, भारतीय मानसशास्त्र संस्था, संसर्गजन्य आजारालय असे अत्यंत महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
डॉ. बिधान चंद्र रॉय हे एक समृद्ध व्यक्तिमत्व होते — राष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात, शैक्षणिक विस्तारात व सामाजिक-आर्थिक नियोजनात त्यांचे ठळक योगदान आपल्या इतिहासात आजही प्रेरणास्पद आहे. त्यांनी वैद्यकीय कौशल्य आणि राजकारणाची जोमदार जोडणी केली, ज्यामुळे आधुनिक पश्चिम बंगालचे मूळ पायाभूत बनले.
———————————————————————————————–