गुगलची URL Shortener सेवा 25 ऑगस्टपासून बंद होणार

0
154
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

दररोज कोट्यवधी युजर्स गुगलच्या विविध सेवा वापरतात. माहितीची सहज देवाणघेवाण करण्यासाठी अनेक युजर्स गुगलच्या URL Shortener या सेवेचा वापर करत असतात. मात्र, आता गुगल कडून या सेवेवर पडदा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुगलची URL Shortener सेवा २५ ऑगस्ट २०२५ पासून पूर्णतः बंद होणार आहे.

गुगलच्या या शॉर्टनिंग टूलचा वापर करून युजर्स लांब URL लहान करून सहज शेअर करू शकत होते. हे टूल वापरणे अतिशय सोपे आणि उपयुक्त होते. मात्र आता गुगलकडून हे टूल कायमचे बंद केल्याने लाखो युजर्सवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
गुगलने २०१८ मध्येच या सेवेच्या बंद होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही सेवा हळूहळू टप्प्याटप्प्याने बंद केली जात होती. गेल्या वर्षी गुगलने स्पष्ट केले होते की, येत्या काळात ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात येईल. आता कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की  २५ ऑगस्टपासून URL Shortener वापरणे शक्य होणार नाही.
४०४ एरर पेज दिसणार
URL Shortener च्या जुन्या लिंक्स किंवा गुगलकडून शॉर्ट केलेल्या लिंक क्लिक केल्यास युजर्सना ४०४ एरर पेज दिसणार आहे. याचा अर्थ संबंधित पेज किंवा लिंक अस्तित्वात नाही. त्यामुळे जे युजर्स अजूनही या लिंक शेअर करत आहेत, त्यांनी त्या वेळेत अपडेट कराव्यात, अन्यथा त्या लिंक्स निष्प्रभ ठरणार आहेत.
URL Shortening साठी आता युजर्सनी Bit.ly, TinyURL, किंवा अन्य टूल्सचा विचार करावा, जे अजूनही कार्यरत आहेत. काही व्यवसायांसाठी ब्रँडेड शॉर्ट डोमेन्स वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते.जर तुमच्याकडे गुगलकडून शॉर्ट केलेल्या URL लिंक असतील, तर त्या २५ ऑगस्टपूर्वी इतर URL Shortener मध्ये अपडेट करून शेअर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्या लिंक क्लिक केल्यास युजर्सना ४०४ एरर दिसू शकतो.

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here