कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापुरात काल रात्रीपासून सुरु असलेला पाऊस आज सकाळपर्यंत सतत चालू होता. सकाळी पावसाने काहीसा विराम घेतला असला तरी आकाशात ढगांची दाटी असून वातावरण दमट आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.