spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयपासपोर्ट सामर्थ्यात भारताची झेप : अमेरिकेची घसरण

पासपोर्ट सामर्थ्यात भारताची झेप : अमेरिकेची घसरण

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२५ अहवाल जाहीर

नवी दिल्ली | प्रसारमाध्यम वृत्तसेवा

जगात भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सातत्याने बळकट होत असल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२५ मध्ये भारताने तब्बल ८ स्थानांची झेप घेत ७७ व्या क्रमांकावर मजल मारली आहे. भारताच्या पासपोर्टने आता ५९ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवेश मिळवला असून, ही एक सकारात्मक कामगिरी मानली जात आहे.
या यादीत सौदी अरेबियानेही आपली मजल उंचावली असून, ४ स्थानांची सुधारणा करत ५४ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारत आणि सौदी सारख्या देशांनी यंदा आंतरराष्ट्रीय संबंधांतील धोरणात्मक सुधारणा, व्यापारवृद्धी आणि परराष्ट्र धोरणातील लवचिकता यामुळे जागतिक क्रमवारीत यश मिळवले आहे.
दरम्यान, यंदाच्या इंडेक्समध्ये सर्वात मोठी चर्चा झाली ती अमेरिका आणि ब्रिटनच्या घसरणीची. ब्रिटनने १८६ देशांमध्ये व्हिसा सुलभता मिळवून यादीत सहावे स्थान मिळवले असले तरी, पूर्वीच्या तुलनेत ही घसरण मानली जात आहे. तर अमेरिका फक्त १८२ देशांमध्ये प्रवेश मिळवत थेट दहाव्या स्थानी पोहोचली असून, हेन्ली इंडेक्स सुरू झाल्यापासूनचे हे सर्वात खालचे स्थान आहे.
यावर्षी सिंगापूरचा पासपोर्ट पुन्हा एकदा सर्वांत प्रभावशाली ठरला आहे. सिंगापूरचे नागरिक तब्बल १९३ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्यामागे जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी व फ्रान्स यांचे पासपोर्ट आघाडीवर आहेत.
यादी तयार करताना इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ( IATA ) च्या माहितीचा आधार घेण्यात येतो. या क्रमवारीत एका देशाच्या नागरिकांना किती देशांत प्रवेश सुलभता आहे, यावर आधारित मूल्यांकन केले जाते.
भारताच्या या प्रगतीमुळे जगभरात भारतीय प्रवाशांसाठी अधिक सुलभता निर्माण होईल. परंतु अजूनही अनेक आशियाई व युरोपीय देशांच्या तुलनेत भारताची स्थिती मध्यम पातळीवर आहे. पुढील टप्प्यावर भारताने द्विपक्षीय व्हिसा सवलती, डिजिटल व्हिसा करार व जागतिक व्यापारसंधींवर भर देण्याची गरज आहे.

———————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments