प्रसारमाध्यम : स्पोर्टस् डेस्क
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि बहुचर्चित स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. माजी क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात एकूण सहा संघ सहभागी झाले असून, यंदाही क्रिकेट रसिकांना चुरशीचे सामने पाहायला मिळणार आहेत.
स्पर्धेतील सर्वात चर्चेचा सामना २० जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. भारताचा कर्णधार युवराज सिंग, तर पाकिस्तानचे नेतृत्व शाहीद आफ्रिदी करत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सुरू होणार असून, नाणेफेक ८.३० वाजता होईल.
प्रमुख संघ व कर्णधार
| संघ | कर्णधार |
|---|---|
| भारत | युवराज सिंग |
| पाकिस्तान | शाहीद आफ्रिदी |
| दक्षिण आफ्रिका | एबी डिव्हिलियर्स |
| वेस्ट इंडिज | ख्रिस गेल |
| इंग्लंड | इऑन मॉर्गन |
| ऑस्ट्रेलिया | ब्रेट ली |
महत्त्वाचे अपडेट
-
स्पर्धेची सुरुवात १८ जुलै रोजी इंग्लंड-पाकिस्तान सामन्याने होणार
-
अंतिम सामना २ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार
-
स्पर्धेत ६ डबल हेडर दिवस – १९, २२, २७, २९, ३१ जुलै
-
भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध – २० जुलै, रात्री ९ वाजता
-
थेट प्रक्षेपण Star Sports वर, लाईव्ह स्ट्रीमिंग FanCode अॅपवर
भारताचा संघ :
शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग (कर्णधार), गुरकीरत सिंग, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, अंबाती रायुडू (यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), अभिमन्यू मिथुन, हरभजन सिंग, पवन नेगी, पियुष कुमार, वरुण कुमार
पाकिस्तानचा संघ :
शर्जील खान, कामरान अकमल, युनूस खान, मिसबाह-उल-हक, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल रज्जाक, वहाब रियाझ, सईद अजमल, सोहेल तन्वीर, सोहेल खान, आसिफ अली, सोहेब मकसूद, आमिर यामीन
भारत-पाकिस्तान सामन्याचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व लक्षात घेता, या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहणार आहे. युवराज-रैना-हरभजन आणि आफ्रिदी-मलिक-मिसबाह यांच्यातील स्पर्धा पुन्हा अनुभवण्याची ही एक अनोखी संधी ठरणार आहे.
—————————————————————————————–



