प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा

प्राडाची कोल्हापुरात भागीदारीची तयारी

0
200
Prada Company delegation holds discussions with District Collector
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळात प्राडाच्या फुटवेअर विभागाचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पाओलो टिव्हरॉन, पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनिएल कोंटू, बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली उपस्थित होते.

या भेटीदरम्यान जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार आणि मेघ गांधी हेही उपस्थित होते.

चर्चेदरम्यान कोल्हापुरी चप्पलसंबंधी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘ कोल्हापुरी चप्पल हा पारंपरिक भारतीय पादत्राणांचा एक प्रकार आहे, ज्याचा इतिहास महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराशी जोडला गेला आहे. कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणे नसून, ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. त्या स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे प्रतीक मानल्या जातात. कोल्हापूरशी या चपलांचे भावनिक नाते जोडले गेले आहे.’ यासह त्यांनी कोल्हापुरी साज, ठुशी आदी पारंपरिक वस्तूंची माहिती दिली.

यावेळी शिष्टमंडळाने सांगितले की, भविष्यात कंपनीमार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विविध पातळ्यांवर करार करण्याचा विचार केला जाऊ शकतो. याबाबत कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर याबाबत जिल्हा प्रशासनासह संबंधित बोर्ड ऑफ असोसिएशन तसेच उत्पादक कंपन्यांना कळविण्यात येईल.

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here