कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
बैलगाडा शर्यत हा एक क्रीडा प्रकार. बैलगाडीतून वाहतूक करताना उत्सानाने पाळणाऱ्या बैलांच्यामुळे ही शर्यत सुरु झाली असावी. शेतकरी राजा बैलाना कधीही मारत नाही. फक्त इशाऱ्यावर बैल पळत असतात. यालाच शर्यतीच, मनोरंजनाचे स्वरूप देण्यात आले.
पारंपारिक बैलगाडी शर्यतीत बैलांना शर्यतीवेळी मारले जात नसायचे. शेतकरी बैलांना शर्यतीसाठी तयार करायचे. त्यांच्यावर प्रेम करायचे. जेव्हा बैल शर्यतीत उतरायचे तेव्हा पूर्ण क्षमतेने मालकाच्या प्रेमापोटी धावायचे. पारंपारिक बैलगाडी शर्यत अशीच सुरु झाली असावी. पुढे बैलगाडी ऐवजी खास शर्यतीसाठी बैलगाडा बनविण्यात आला. राज्यातील अशा पारंपरिक बैलगाडा शर्यतींवर आक्षेप घेत प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने १८ मे २०२३ रोजी या मुद्यावर स्पष्ट निर्णय दिला असून, अशा शर्यतींना कायदेशीर मान्यता दिलेली आहे.
या निर्णयानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तमिळनाडूमधील जल्लीकुट्टू आणि कर्नाटकातील कांबळा या पारंपरिक स्पर्धांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या परंपरागत क्रीडा प्रकारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने नामंजूर केली.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बोरुगाडा शर्यतीशी संबंधित सर्व मुख्यांवर अंतिम निर्णय घेतला आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही आदेशांची आवश्यकता नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयाला बांधील आहोत, असे स्पष्ट करून मुख्य न्या. आलोक आराचे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट करत याचिका फेटाळून लावली.
राज्यात विविध भागांत बैलगाडा शर्यतींना सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून, त्या पारंपरिक उत्सवांचा भाग आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०२३ च्या निर्णयात या शर्यतींमध्ये प्राण्यांच्या कल्याणासाठी ठरावीक नियम आणि अटी घालून त्या परवानगीने आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यतीच्या समर्थकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर प्राणीहक्क कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी दर्शवली आहे.
——————————————————————————————————